खेळणं ही शिक्षणाच्या मधल्या सुट्टीत करण्याची गोष्ट नव्हे.
पूर्णपणे तल्लीन होऊन, अनुभवात बुडून जाऊन खेळताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शिक्षण होतच असतं.
- व्हिन्स जॉनन -
कोल्हापूर येथे गेले ७ वर्षे सातत्याने कार्यरत असणाऱ्या आनंदी बालभवन फाऊंडेशनचे विविध उपक्रम सर्वाना येथे पाहावयास मिळतील. ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी कौशल्य विकास आणि जाणीव जागृतीचे उपक्रम समविचारी व्यक्ती आणि संस्थाना सोबत घेऊन आयोजित करणारी आनंदी बालभवन फाऊंडेशन संस्था 'हसत खेळत शिक्षण' हा हेतू साध्य करत आहे.
आनंदी बालभवन फाउंडेशन आयोजित
एक वैचारिक कार्यशाळा