बालशिक्षण या क्षेत्रात जगभरात विविध स्तरावर मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. मूल शिकतं म्हणजे नेमकं काय करतं? शिकण्यासाठीच्या कुठल्या क्रिया त्याला जास्त भावतात? कुठल्या क्रियांचा त्याला कंटाळा येतो? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकतात! असतातच!! एकाच पठडीमधे, साच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त जणांना घेऊन त्यांच्यावर काम नाही करू शकत.
या कार्यात वैविध्याची असलेली गरज, येणाऱ्या मर्यादा आणि असलेल्या संधी विचारात घेऊन अनेक शिक्षण तज्ञानी आपापल्या स्तरावर बहुमोल कार्य केले आहे. आज देखील करीत आहेत. स्थानिक स्तरावर असलेली या कार्याची गरज लक्षात घेऊन 'आनंदी बालभवन फाउंडेशन' ची सुरुवात आठ वर्षांपूर्वी झाली.